Posts

फळबागेसाठी ठिबक सिंचनाचे नियोजन

Image
राष्ट्रीय कृषी विकास योजना - सिंचन पाणी गरज सल्ला सेवा $$$ फळबागेसाठी ठिबक सिंचनाचे नियोजन $$$ फळपिकाची पाण्याची गरज ही पिकाचा प्रकार, पिकाच्या वाढीची अवस्था, जमिनीचा प्रकार, हवामान यावर अवलंबून असते. पिकास गरजेप्रमाणे पाणी द्यावे. कमी पाणी दिल्यास पिकावर पाण्याचा ताण बसून उत्पादनात घट होऊ शकते. हे लक्षात घेऊन ठिबक सिंचनाचे नियोजन करावे.  डॉ. सुनील गोरंटीवार  ठिबक सिंचन पद्धतीद्वारे ५० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होऊन १० ते २५ टक्के उत्पादनात वाढ होते. २५ टक्क्यांपर्यंत खताच्या वापरात बचत होते. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब शास्त्रीय पद्धतीने करणे आवश्यक आहे व त्यासाठी खाली नमूद केलेले प्रमुख मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे.  तोट्यांचा प्रवाह -  १) तोट्यांचा प्रवाह निश्चित करण्यासाठी विविध बाबी लक्षात घ्यावयाच्या असतात. तोट्यांचा प्रवाह हा जमिनीत पाणी आत जाण्याच्या वेगापेक्षा कमी असावा की जेणेकरून तोट्यांमधून जमिनीवर पाणी पडल्यावर ते साठविले जाऊ नये. जमिनीवर जर पाणी साठविले गेले तर पाण्याचे बाष्पीभवन होऊन तसेच जमिनीला उतार असल्यास ते वाहून वाया जाते. जमिनीवर पाणी जास्त का...

शेततळ्यातून सायफन पद्धतीने द्या पिकांना पाणी

Image
राष्ट्रीय कृषी विकास योजना - सिंचन पाणी गरज सल्ला सेवा ####  शेततळ्यातून सायफन पद्धतीने द्या पिकांना पाणी  #### सायफनद्वारे पाणी शेततळ्यातून शेतापर्यंत नेता येते. सायफन म्हणजे एक अशी नळी, की जिच्यामध्ये पाण्याचा प्रवाह सतत चालू ठेवावा लागतो. याद्वारे पाणी जास्त पातळीवरून कमी पातळीवर नेता येते. असे करताना ज्या ठिकाणाहून पाणी जिथपर्यंत न्यायचे आहे, त्यामध्ये या दोन्ही ठिकाणांपेक्षाही उंच अडथळा असेल, तर तो पार करून पाणी नेता येते. सायफन प्रणालीचे अनेक फायदे आहेत. त्यांपैकी महत्त्वाचा म्हणजे एकदा सायफनचे कार्य चालू झाले, की त्यामधून पाणी सतत वाहते ठेवण्यासाठी ऊर्जा लागत नाही. शेततळ्याच्या वरच्या भागातील पिकांना पाणी द्यायचे असेल, तेव्हा ते पंपाच्या साह्याने नेता येते; पण जेव्हा खालच्या भागातील पिकांना पाणी द्यावयाचे असते, तेव्हा या पद्धतीचा वापर फायदेशीर ठरू शकतो. या पद्धतीने पाण्याचा झिरपण्याद्वारे अनावश्‍यक नाश होत नाही (जसा चरांच्या साह्याने पाणी देताना होतो). सायफनद्वारे पाणी शेततळ्यातून शेतापर्यंत नेता येते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या डॉ. अण्णासाहेब शिंद...

असे करा विहीर, कूपनलिका पुनर्भरण

Image
*राष्ट्रीय कृषी विकास योजना* ^^^ असे करा विहीर, कूपनलिका पुनर्भरण ^^^ पावसाळ्याच्या दिवसात विहिरीत भूजल पुनर्भरण केल्याने ज्या जलस्तरातून पाणी उपसले गेले होते, त्या जलस्तरात विहिरीतील पाणी शिरते. पावसाळ्याच्या संपूर्ण हंगामात अशा प्रकारे पाणी भरलेल्या विहिरींच्या सर्वांत जास्त खोलवर असलेल्या थरात भूजलसाठा पूर्ववत होऊ शकतो. याचबरोबरीने कूपनलिकेद्वारे भूजल पुनर्भरण करणे शक्‍य आहे.  *डॉ. सुधीर दहीवाळकर, डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. सुनील कदम, किरण पवार*  अलीकडच्या काळात भूजलाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने भूजल पातळी खालावत आहे. भूजलाच्या शोधात प्रत्येक शेतकरी विहिरी दरवर्षी खोल करताना दिसतात. याचे मुख्य कारण म्हणजे विहिरीद्वारे भूजलाचा उपसा होण्याचे प्रमाण, हे जमिनीत मुरणाऱ्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. पर्यायाने भूजल पातळी खोलवर जात आहे. वर्षभर पाण्याच्या उपलब्धतेसाठी भूजल पातळी स्थिर राहणे गरजेचे आहे. भूजलसाठ्यात वाढ होण्यासाठी अति उपशावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. याचबरोबरीने भूजल पातळी स्थिर राहण्याकरिता दुसरा उपाय म्हणजे भूजल पुनर्भरण हा होय.  जमिनी...

*महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी* यांनी विकसित केले पिक पाणी व्यवस्थापनासाठी *फुले इरिगेशन शेड्युलर* हे मोबाईल अप्प...

Image
वनस्पती अन्न बनविण्याच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमधील पाणी हा महत्वाचा घटक असल्यानेगरजेपेक्षा कमी अथवा अधिक पाणी दिल्यास पिकाच्या वाढीवर व पर्यायाने उत्पादनावर अनिष्ट परिणाम होऊन उत्पादन, प्रत घसरते. याकरिता पिकासाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे जरूरीचे आहे. पाण्याचे नियोजन हे प्रामुख्याने जमिनीचा प्रकार, हंगाम, पीक प्रकार,पिकाच्या वाढीच्या अवस्था व हवामान  इत्यादी बाबींवर अवलंबून असते. पाण्याचे योग्य नियोजन करणे म्हणजे एखाद्या पिकास हंगामानुसार व त्याच्या गरजेनुसार किती पाणी द्यावे? पाण्याची गरज भागविण्यासाठीसिंचन पाणी देण्याच्या वेळेमध्ये किती अंतर ठेवावे वपाणी देताना प्रत्येक वेळी किती पाणी द्यावे? या सर्व गोष्टींचा समावेश होतो. पीक उत्पादनामध्ये अत्यंत महत्त्वाचे असणारे पाणी नियोजन करण्यास मदत करणारे *राष्ट्रीय कृषि विकास योजने* अंतर्गत *सिंचन पाणी गरज सल्ला सेवा* प्रकल्प, *जलसिंचन व निचरा विभाग*, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी *फुले इरिगेशन शेड्युलर* हे मोबाईल अप्प विकसित केलेले आहे. *फुले इरि...

पिकाची पाण्याची नेमकी गरज मिळवूया-

Image
राष्ट्रीय कृषी विकास योजना - सिंचन पाणी गरज सल्ला सेवा पिकाची पाण्याची नेमकी गरज मिळवूया- महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विविध पिकांवर संशोधन करून पिकास गरजेप्रमाणे पाणी काढण्याची पद्धत विकसित केली आहे. त्याची सूत्रे व पद्धती जाणून घेऊ.  डॉ. सुनील गोरंटीवार पिकाची पाण्याची गरज काढण्याची पद्धत फळझाडांसाठी (म्हणजे जेव्हा दोन झाडांमधील व झाडाच्या दोन ओळींमधील अंतर जास्त असते, उदा. डाळिंब, लिंबू, आंबा इ.) व ओळींमध्ये घेण्यात येणाऱ्या पिकांसाठी (जेव्हा दोन रोपांमधील व रोपांच्या दोन ओळींमधील अंतर कमी असते, उदा. भाजीपाला, पिके, ऊस इ.) वेगळी आहे. फळझाडांसाठी एका झाडाला पाणी देण्यासाठी कार्यक्षम मुळाचे संपूर्ण क्षेत्र ओले ठेवण्यासाठी तोट्यांची संख्या काढावी लागते, तर ओळीमध्ये घेण्यात येणाऱ्या पिकांसाठी ओळीचा संपूर्ण पट्टा ओला ठेवण्यासाठी दोन तोट्यांमधील अंतर काढावे लागते. राष्ट्रीय कृषी विकास योजना - सिंचन पाणी गरज सल्ला सेवा फळझाडासाठी पाण्याची गरज - पिकास लागणारे पाणी (लिटर/दिवस/झाड) किंवा (लिटर/दिवस/तोटी) = (अ ब क ड )--- भागिले ---- ई --------(1) अ = संदर्भीय बाष...

सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी महत्त्वाच्या बाबी...

Image
राष्ट्रीय कृषी विकास योजना - सिंचन पाणी गरज सल्ला सेवा माती पाणी संबंध -   मातीच्या प्रकारानुसार मातीची जलधारणक्षमता, निचरा, मातीतील पाण्याची हालचाल, पिकांकडून पाण्याचे शोषण इ. बाबी बदलत जातात. मातीच्या कणांच्या रचनेवर मातीतील पाण्याची हालचाल अवलंबून असते. - हलक्‍या जमिनीतील मातीच्या कणांचा आकार मोठा असून, पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी असते. - मध्यम प्रकारच्या जमिनीत वाळू व पोयट्याच्या प्रमाणापेक्षा चिकण मातीच्या कणांचे प्रमाण कमी असते. या जमिनीत बऱ्यापैकी पाण्याचा निचरा होतो व हवा खेळती राहते. - भारी जमिनीत वाळूपेक्षा पोयटा व चिकण कणांचे प्रमाण जास्त असते. अशा जमिनी पाणी धरून ठेवत असल्या तरी हवा खेळती राहण्याचे प्रमाण कमी असते. - जमिनीचा रंग, जमिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन, मातीची सच्छिद्रता, मातीतील सेंद्रिय कर्बांचे प्रमाण याचा पाणी व्यवस्थापन करताना विचार करावा लागतो. पीक-पाणी संबंध - पिकाने केशाकर्शण दाबाने मुळाद्वारे शोषलेल्या पाण्यापैकी एक-दोन टक्के पाण्याचा वापर पीक स्वतःच्या चयापचय क्रियेसाठी करते. उरलेले पाणी पर्णछिद्रांद्वारे वातावरणात सोडून दिले जात...