Posts

Showing posts from April, 2017

पिकासाठी वापर योग्य रंग, गुणधर्माचे प्लॅस्टिक मल्चिंग

राष्ट्रीय कृषी विकास योजना - सिंचन पाणी गरज सल्ला सेवा **** पिकासाठी वापर योग्य रंग, गुणधर्माचे प्लॅस्टिक मल्चिंग **** अलीकडे विविध पिकांमध्ये प्लॅस्टिक मल्चिंग करण्याचे प्रमाण वाढत आहे. याचे रंग, गुणधर्मानुसार विविध प्रकार असून, योग्य कारणासाठी योग्य प्लॅस्टिकचा वापर केल्यास पिकांसाठी फायदा होतो. डॉ. सुनील गोरंटीवार   पिकातील खते व पाण्याचा ऱ्हास रोखण्यासाठी प्रामुख्याने आच्छादनाचा वापर केला जातो. त्यामध्ये सेंद्रिय आणि प्लॅस्टिक असे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. प्लॅस्टिक आच्छादनाचे प्रकार - पीक आणि फळबाग लागवडीमध्ये आच्छादनासाठी पीव्हीसी, एलडीपीई या प्रकारच्या प्लॅस्टिक फिल्मचा उपयोग करता येतो. अलीकडे अतिशय पातळ व छेदन प्रतिकारकशक्ती असल्याने एलडीपीईपेक्षा एलएलडीपीई प्लॅस्टिक फिल्मला प्राधान्य दिले जाते. त्याचे रंग व गुणधर्मानुसार काही प्रकार पडतात. - पारदर्शक प्लॅस्टिकचे आच्छादन - पारदर्शक आच्छादनामुळे सूर्याची किरणे जमिनीपर्यंत जाऊ शकतात. मात्र, जमिनीपासून परावर्तित होणारी ऊर्जा ही आच्छादनामुळे अडविली जाते. परिणामी जमिनीचे तापमान वाढण्यास म...