कमी पाझर असलेल्या जमिनीत बांधा शेततळे

राष्ट्रीय कृषी विकास योजना - सिंचन पाणी गरज सल्ला सेवा कमी पाझर असलेल्या जमिनीत बांधा शेततळे बहुतांश शेतकऱ्यांनी पीक काढणी पूर्ण केली आहे. संरक्षित सिंचनासाठी शेततळ्यांचा होणारा फायदा लक्षात घेता त्यांनी येत्या काळात शेततळे निर्मिती करण्याकडे लक्ष द्यावे. ज्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे अशी जागा शोधून तेथे शेततळ्याची निर्मिती करावी. - डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. सुधीर दहिवाळकर शेततळे म्हणजे काय? त्याचे विविध प्रकार इत्यादी तांत्रिक बाबींची माहिती घेतल्यास शेतकऱ्याला त्याच्या सोयीनुसार पाणी साठविता येते. त्याबाबत माहिती घेऊ. शेततळे व साठवणूक तळे म्हणजे काय? - शेतजमिनीवरून पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी खोदलेल्या तळ्यास शेततळे असे म्हणतात. नाला, ओघळीचे काठावरील पडीक क्षेत्रात शेततळे घेतात. शेततळ्यात पावसाचे पाणी साठण्यासाठी शेततळ्याच्या वरील बाजूस पाणलोट क्षेत्राची आवश्यकता असते. - कमी क्षेत्र असलेले किंवा बागायतदार शेतकरी इतर ठिकाणांहून पाणी आणून शेतात तळे करून साठवितात, त्याला साठवणूक तळे असे म्हणतात. शेततळ्याचे फायदे : - आपत्कालीन स्थितीत पिक...