पिकाची पाण्याची नेमकी गरज मिळवूया-
राष्ट्रीय कृषी विकास योजना - सिंचन पाणी गरज सल्ला सेवा
पिकाची पाण्याची नेमकी गरज मिळवूया-
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विविध पिकांवर संशोधन करून पिकास गरजेप्रमाणे पाणी काढण्याची पद्धत विकसित केली आहे. त्याची सूत्रे व पद्धती जाणून घेऊ.
डॉ. सुनील गोरंटीवार
पिकाची पाण्याची गरज काढण्याची पद्धत फळझाडांसाठी (म्हणजे जेव्हा दोन झाडांमधील व झाडाच्या दोन ओळींमधील अंतर जास्त असते, उदा. डाळिंब, लिंबू, आंबा इ.) व ओळींमध्ये घेण्यात येणाऱ्या पिकांसाठी (जेव्हा दोन रोपांमधील व रोपांच्या दोन ओळींमधील अंतर कमी असते, उदा. भाजीपाला, पिके, ऊस इ.) वेगळी आहे. फळझाडांसाठी एका झाडाला पाणी देण्यासाठी कार्यक्षम मुळाचे संपूर्ण क्षेत्र ओले ठेवण्यासाठी तोट्यांची संख्या काढावी लागते, तर ओळीमध्ये घेण्यात येणाऱ्या पिकांसाठी ओळीचा संपूर्ण पट्टा ओला ठेवण्यासाठी दोन तोट्यांमधील अंतर काढावे लागते.
राष्ट्रीय कृषी विकास योजना - सिंचन पाणी गरज सल्ला सेवा
फळझाडासाठी पाण्याची गरज -
पिकास लागणारे पाणी (लिटर/दिवस/झाड) किंवा (लिटर/दिवस/तोटी) = (अ ब क ड )--- भागिले ---- ई --------(1)
अ = संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जन (मिमि/दिवस) - हे हवामानातील तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, दिवसाचे सूर्यप्रकाशाचे तास यांसारख्या घटकांवर अवलंबून असते.
ब = पीक गुणांक (तक्ता क्र. २ पहावा.)
क = ओलित गुणांक (तक्ता क्र. २ पहावा.)
ड = झाडांनी व्यापलेले क्षेत्र (वर्ग मीटर, मी x मी)
ई = संचाची कार्यक्षमता
वर दिलेल्या सूत्रांमध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध घटकांची माहिती खालीलप्रमाणे काढावी.

अ. संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जन काढण्याच्या प्रमुख दोन पद्धती आहेत.
१. पेनमन मॉटिथ पद्धत - या पद्धतीद्वारे विशिष्ट प्रदेशाचे दररोजचे कमाल व किमान तापमान, कमाल व किमान आर्द्रता, सूर्यप्रकाशाचे तास व वाऱ्याचा वेग माहिती असेल, तर सूत्राच्या साह्याने संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जन काढता येते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यासाठी दर आठवड्याचे सरासरी बाष्पपर्णोत्सर्जन काढण्याचे कार्य सुरू आहे.
२. बाष्पीभवन पात्र पद्धत - संपूर्ण गावासाठी एक बाष्पीभवन पात्र (साधारण किंमत २० ते ४० हजार रुपये) बसविल्यास फायद्याचे ठरू शकते. बाष्पीभवन पात्र १.२ मीटर व्यासाचे व ३० सेंमी खोलीचे दोन्ही बाजूने पांढऱ्या रंगाने रंगविलेले असते. हे पात्र लोखंडी पत्र्यापासून बनविलेले असते. हे पात्र शेतात एका लाकडी चौकटीवर ठेवावे. चौकटीखालून हवा खेळत राहील हे बघावे.
बाष्पीभवन पात्राच्या मध्यभागी एक दर्शक असतो. या दर्शकाला एक मोजपट्टी बसविली असते. बाष्पीभवन पात्र प्रथम दर्शकाचे टोकापर्यंत भरावे (सकाळी ८ चे दरम्यान). दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता पाण्याची खाली गेलेली पातळी मोजावी. बाष्पीभवन पात्रातून होणारे बाष्पीभवन हे जमिनीमधून होणाऱ्या बाष्पीभवनाच्या ७० ते ८० टक्के असते. यालाच बाष्पीभवन पात्र गुणांक असे संबोधतात. गुणांक असल्याने हा ०.७ ते ०.८ इतका घ्यावा. पश्चिम महाराष्ट्रासाठी हा गुणांक ०.८ इतका धरावा. बाष्पीभवन पात्रातील बाष्पीभवनास (मिलिमीटर) बाष्पीभवन पात्र गुणांकाने गुणल्यास संदर्भीय पर्णोत्सर्जन मिळते.
---

पीक गुणांक (ब) - पीक व पिकांच्या अवस्थेप्रमाणे बदलती पाण्याची गरजही पीक गुणांकाच्या साह्याने मिळते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने काही पिकांसाठी पिकांच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे पीक गुणांक प्रयोगाद्वारे निश्चित केले आहे. विशिष्ट प्रदेशासाठी पीक गुणांक उपलब्ध नसल्यास अन्न व कृषी संस्था (FAO) ने प्रकाशित केलेले पीक गुणांक गृहित धरावे. पीक गुणांक हा साधारणतः पीक व पिकाच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे ०.२ ते १.१५ च्या दरम्यान असू शकतो.
काही महत्त्वाच्या पिकांचा अधिकतम पीक गुणांक -
भाजीपाला - ०.८५, फळझाडे - ०.७५, केळी - १.०, ऊस - १.१०.
पिकाच्या अवस्थेप्रमाणे प्रमुख पिकांचा पीक गुणांक तक्ता क्र. २ व ३ मध्ये दिलेले आहेत.
पिकाच्या अवस्थेप्रमाणे प्रमुख पिकांचा पीक गुणांक तक्ता क्र. २ व ३ मध्ये दिलेले आहेत.
राष्ट्रीय कृषी विकास योजना - सिंचन पाणी गरज सल्ला सेवा
ओलित गुणांक (क) -
पिकास मुळांच्या कार्यक्षम क्षेत्रात पाणी द्यावे लागते. प्रवाही व फवारा सिंचन पद्धतीद्वारे जमिनीच्या संपूर्ण पृष्ठभागावर पाणी दिले जाते. त्यामुळे मुळांच्या कार्यक्षम कक्षेसह इतरही भाग ओला होतो. परंतु ठिबक सिंचन प्रणालीमध्ये तोट्यांची संख्या व प्रवाह यांचा व्यवस्थित मेळ घालून पाणी मुळाच्या कक्षेमध्ये नेमके देता येते. झाडाचे संपूर्ण क्षेत्रफळ गृहीत न धरता फक्त जो भाग ओला करावयाचा आहे तेवढाच गृहित धरावा. त्यासाठी एकूण क्षेत्रफळास ओलित गुणांकाने गुणावे लागते.
ओलित गुणांक पीक व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार सुद्धा बदलत जातो. मुख्यत्वेकरून फळझाडांसाठी सुरवातीच्या काळात कार्यक्षम मुळांचे क्षेत्र हे जास्त नसल्याने ओलित गुणांक हासुद्धा कमी असतो व तो झाडाच्या वयाप्रमाणे वाढत जातो. हा नंतर स्थिर होतो. ओलित गुणांक ०.१ ते १.० एवढा पिकानुसार गृहित धरावा.
काही महत्त्वाच्या पिकांचा अधिकतम ओलित गुणांक खालीलप्रमाणे आहे.
१. खूप कमी अंतरावरची पिके (उदा. लसूण, कांदा, भुईमूग इ. ) - १.०
२. कमी अंतरावरची पिके (उदा. भाजीपाला, ऊस) -०.६ ते ०.८
३. मध्यम अंतरावरची पिके (उदा. केळी, द्राक्षे) -०.४ ते ०.६
४. जास्त अंतरावरची पिके (उदा. फळझाडे - डाळिंब, लिंबू) - ०.२ ते ०.४
५. खूप अंतरावरची पिके (उदा. आंबा, नारळ, चिकू) - ०.२ ते ०.२५
झाडांच्या वयोमानाप्रमाणे प्रमुख पिकांचा ओलित गुणांक तक्ता क्र. २ व ३ मध्ये नमूद केला आहे.

डॉ. सुनील गोरंटीवार, ०२४२६-२४३२६८, २४३३२६
(प्रमुख जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

पिक सिंचन पाणी गरज, पाणी व्यवस्थापन, पाणी संवर्धन, इत्यादी शेती क्षेत्रातील पाणी निगडीत शास्त्रीय माहितीकरिता आजच 'राष्ट्रीय कृषी विकास योजना - सिंचन पाणी गरज सल्ला सेवा' हे फेसबूकवरील लाईक करा...
आपण आपल्या ब्लॉगला भेट देऊनही सविस्तर लेख मिळवू शकता...
खालील लिंकवर जाऊन आपले फेसबुक पेज लाईक करा...
https://www.facebook.com/iwrasrkvy/
खालील लिंकवर जाऊन आपल्या ब्लॉगला भेट द्या...
http://rkvyiwras.blogspot.in/

Comments
Post a Comment